Hiravya Kurni

Vasant Prabhu, P Savalaram

हिरव्या कुरणी
हिरव्या कुरणी घडली कहाणी बाई नवलाची
बाई नवलाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची
हिरव्या कुरणी

वादळवारा असाच आला हो हो ओ ओ
वादळवारा असाच आला
अशीच बिजली लवलवली
हरिणीच्या त्या मोहक नयनी
धुंद कस्तुरी घमघमली हो हो
धुंद कस्तुरी घमघमली
शिकारी नजर वाघाची
शिकारी नजर वाघाची बघुन भुललेली
बघुन भुललेली
खेचली धनुकली हसून तिने नयनाची
खेचली धनुकली हसून तिने नयनाची हो हो ओ ओ
हिरव्या कुरणी

उरी तयाच्या बाण लागता
तिची जवानी थयथयली
उरी तयाच्या बाण लागता
तिची जवानी थयथयली
व्याकुळतेने शपथ घालता
चंचल हरिणी हळहळली हो हो
चंचल हरिणी हळहळली
माघारी नयन सुंदरी
माघारी नयन सुंदरी परत वळलेली
परत वळलेली
हळुहळु जखम ती आली मिळून हृदयाची
हळुहळु जखम ती आली मिळून हृदयाची हो हो
हिरव्या कुरणी
हिरव्या कुरणी घडली कहाणी बाई नवलाची
बाई नवलाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची हो हो
हिरव्या कुरणी

Trivia about the song Hiravya Kurni by Lata Mangeshkar

Who composed the song “Hiravya Kurni” by Lata Mangeshkar?
The song “Hiravya Kurni” by Lata Mangeshkar was composed by Vasant Prabhu, P Savalaram.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score