Ja Ja Ranichya Pakhara

Anandghan, Shanta Shelke

जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा
जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा
तुला घालिते चारा तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा जा रं भरारा
जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा

दूर डोंगरापल्याड नदीकाठी माजा गाव
तिथं नांदतोया देव नरसूबाराव देव नरसूबाराव
ल्हान थोरासी मायेचा त्योच आसरा
तुला घालिते चारा तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा जा रं भरारा

बाई म्हायेराचं थोरपण वानु कसं
पुण्यवंत माज मायबाप देव जसं
पुण्यवंत माज मायबाप देव जसं
गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा
तुला घालिते चारा तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा जा रं भरारा

माज्या खुशालीचा सांगावा दे माऊलीला
पड पाया तिच्या सांग येती याद मला सांग येती याद मला
तुला भेटाया होतो माझा जीव घाबरा
तुला घालिते चारा तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा जा रं भरारा
जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा

Trivia about the song Ja Ja Ranichya Pakhara by Lata Mangeshkar

Who composed the song “Ja Ja Ranichya Pakhara” by Lata Mangeshkar?
The song “Ja Ja Ranichya Pakhara” by Lata Mangeshkar was composed by Anandghan, Shanta Shelke.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score