Jibhit Majhe Have Tula Tar

Vasant Prabhu, P Savalaram, VASANT PRABHU

जीवित माझे हवे तुला तर घेऊन जा तू आता
घेऊन जा तू आता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा
नाथा नकोस नेऊ नाथा
जीवित माझे हवे तुला तर

संसाराची पूजा जाशी उधळुन अर्ध्यावरती
मंगल मी रे रचिले देऊळ तुझ्याच मूर्तीभवती
अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती
ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता नसता
कळस गोपुरी नसता
जीवित माझे हवे तुला तर

तुझ्यासवे तो हर्षही गेला खेदही उरला नाही
पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही
कुंकुमतिलक भूषण भावी इतुकेच नाथा देई
मिळेल मजला भाग्य सतीचे तूही जवळी नसता नसता
तूही जवळी नसता
जीवित माझे हवे तुला तर घेऊन जा तू आता
घेऊन जा तू आता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा
नाथा नकोस नेऊ नाथा
जीवित माझे हवे तुला तर

Trivia about the song Jibhit Majhe Have Tula Tar by Lata Mangeshkar

Who composed the song “Jibhit Majhe Have Tula Tar” by Lata Mangeshkar?
The song “Jibhit Majhe Have Tula Tar” by Lata Mangeshkar was composed by Vasant Prabhu, P Savalaram, VASANT PRABHU.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score