Mag Majha Jeev Tujhya

Suresh Bhat

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात
सहज कधी तू घरात
लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या

जेव्हा तू नाहशील
दर्पणात पाहशील
जेव्हा तू नाहशील
दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दर्वळेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव तुझ्या

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
मग माझा जीव

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मग माझा जीव

Trivia about the song Mag Majha Jeev Tujhya by Lata Mangeshkar

Who composed the song “Mag Majha Jeev Tujhya” by Lata Mangeshkar?
The song “Mag Majha Jeev Tujhya” by Lata Mangeshkar was composed by Suresh Bhat.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score