Majhe Gaane

BALKAVI THOMBRE, HRIDAYNATH MANGESHKAR

माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे
माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे
अक्षय गाणे अभंग गाणे गाणे हे गाणे माझे गाणे

सर्व जगाचे मंगल मंगल माझे गाणे
सर्व जगाचे मंगल मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे हे प्रियकर माझे गाणे मी गात माझे गाणे

निरध्वनी हे मूक गान हे यास म्हणो कोणी
निरध्वनी हे मूक गान हे यास म्हणो कोणी
नभांत हे साठवले याने दुमदुमली अवनी
सर्व धर्म हे भेद-पंथही सर्व एक झाले
माझे माझे विश्व तार ही प्रेमाची बोले माझे गाणे

ही मोक्षाची स्वातंत्र्याची उन्‍नतिची माला
ही मोक्षाची स्वातंत्र्याची उन्‍नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली माझे गाणे
माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे

Trivia about the song Majhe Gaane by Lata Mangeshkar

Who composed the song “Majhe Gaane” by Lata Mangeshkar?
The song “Majhe Gaane” by Lata Mangeshkar was composed by BALKAVI THOMBRE, HRIDAYNATH MANGESHKAR.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score