मन मिळे जिथे दोघांचे

Vasant Prabhu, P Savalaram

मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे

हो हो कनकाच्या बांधुनी भिंती राहता चतुर्भुज प्रीती
कनकाच्या बांधुनी भिंती राहता चतुर्भुज प्रीती
हर्षाने उधळित मोती नक्षत्र आलं बाई स्वाती
हर्षाने उधळित मोती नक्षत्र आलं बाई स्वाती
कर जुळे पृथ्वी चंद्राचे
कर जुळे पृथ्वी चंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे

दोन जिवांची पुष्पे फुलली
दोन जिवांची पुष्पे फुलली चिरकाली चंद्रमहाली
आनंदे नाचत आली स्वर्गीची लक्ष्मी खाली
आनंदे नाचत आली स्वर्गीची लक्ष्मी खाली
सुख झुले घरी इंद्राचे
सुख झुले घरी इंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
मन मिळे जिथे दोघांचे

Trivia about the song मन मिळे जिथे दोघांचे by Lata Mangeshkar

Who composed the song “मन मिळे जिथे दोघांचे” by Lata Mangeshkar?
The song “मन मिळे जिथे दोघांचे” by Lata Mangeshkar was composed by Vasant Prabhu, P Savalaram.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score