Mavlatya Dinkara
मावळत्या दिंनकरा
मावळत्या दिंनकरा
अर्घ्य तुज जो्डुनि दोन्ही करां
मावळत्या दिंनकरा
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा.
मावळत्या दिंनकरा
उपकाराची कुणा आठवण
'शितें तोंवरी भूते' अशी म्हण
जगांत भरलें तोंडपुजेपण
जगांत भरलें तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा
मावळत्या दिंनकरा
असक्त परि तूं केलिस वणवण
दिलेंस जीवन हे नारायण
असक्त परि तूं केलिस वणवण
दिलेंस जीवन हे नारायण
मनीं न धरिले सानथोरपण
समदर्शी तूं खरा
मावळत्या दिंनकरा
अर्घ्य तुज जो्डुनि दोन्ही करां
मावळत्या दिंनकरा