Nischhyayacha Mahameru

Hridaynath Mangeshkar, Sant Ramdas (Traditonal)

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी
नरपति हयपति गजपति
गडपति भूपति जळपति
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी
यशवंत कीर्तिवंत
सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत
जाणता राजा
आचारशील विचारशील
दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील
सकळा ठायीं
धीर उदार गंभीर
शूर क्रियेसि तत्पर
सावधपणे नृपवर
तुच्छ केले
देव धर्म गोब्राह्मण
करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण
प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी
धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही
तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला
कित्येकांसि धाक सुटला
कित्येकांस आश्रयो जाहला
शिवकल्याणराजा
शिवकल्याणराजा
शिवकल्याणराजा

Trivia about the song Nischhyayacha Mahameru by Lata Mangeshkar

Who composed the song “Nischhyayacha Mahameru” by Lata Mangeshkar?
The song “Nischhyayacha Mahameru” by Lata Mangeshkar was composed by Hridaynath Mangeshkar, Sant Ramdas (Traditonal).

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score