Payavari Priyacha sarv

Santa Shelke

काया जरी निमाली का प्रीत ओसरेल
छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल

पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी
मी एक प्रेमवेडी

प्रीतीसवे हसावे प्रीतीसवे रुसावे
प्रीतीशिवाय काही डोळ्यास ना दिसावे डोळ्यास ना दिसावे
त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी
पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी
मी एक प्रेमवेडी

दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची
वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची पर्वा नसे जगाची
ज्योतीवरी पतंग पंखांस दाहणारी
पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी
मी एक प्रेमवेडी

Trivia about the song Payavari Priyacha sarv by Lata Mangeshkar

Who composed the song “Payavari Priyacha sarv” by Lata Mangeshkar?
The song “Payavari Priyacha sarv” by Lata Mangeshkar was composed by Santa Shelke.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score