Preet Rangali Ga

Shrikrishna Powale, Shafi Mohd

प्रीत रंगली ग हं हं हं आ आ आ

प्रीत रंगली ग कशी राजहंसी
प्रीत रंगली ग कशी राजहंसी
अग बाई ग लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी
प्रीत रंगली ग कशी राजहंसी
अग बाई ग लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी

तुझिया कपोली प्रीत रंगली ग
लाजून हसली बघ इकडे ग
धरिसी कशाला पदर उराशी
तुझी रे हंसी फसली कैसी पडली पाशी
धीट किती हा रमण विलासी
बोले ना तुझ्याशी
प्रीत रंगली ग कशी राजहंसी
अग बाई ग लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी
आ आ आ ओ ओ ओ ओ ओ आ आ आ

रुसली राणी डोळां पाणी हास्य आननी
नजर तुझी घे थरथरणारी वरती जराशी
गोड बोलुनी प्रेम दावुनी हृदय जिंकुनी
जाल सोडुनी कुठे दूर देशी
बोले ना तुझ्याशी
प्रीत रंगली ग कशी राजहंसी
प्रीत रंगली ग कशी राजहंसी
अग बाई ग लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी

Trivia about the song Preet Rangali Ga by Lata Mangeshkar

Who composed the song “Preet Rangali Ga” by Lata Mangeshkar?
The song “Preet Rangali Ga” by Lata Mangeshkar was composed by Shrikrishna Powale, Shafi Mohd.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score