Punavechya Ghari

Vasant Prabhu, P Savalaram

पुनवेच्या घरी निळी गोजिरी निजली अंगाई
नीज गुणिले नीज लवलाही
पुनवेच्या घरी निळी गोजिरी निजली अंगाई
नीज गुणिले नीज लवलाही

तव नयनीच्या नक्षत्राला दृष्ट व्हायची या चंद्राची
तव नयनीच्या नक्षत्राला दृष्ट व्हायची या चंद्राची
पुष्पदळे ही पापण्यांची झणि लडिवाळे मिटुनी घेई
निजली अंगाई नीज गुणिले नीज लवलाही

लाजविणारी जाईजुईला करांगुलीची कोमलताही
लाजविणारी जाईजुईला करांगुलीची कोमलताही
गोड कहाणी सांगून तीही अधुनीमधुनी देत जांभई
निजली अंगाई नीज गुणिले नीज लवलाही

सर्व सुखांची प्रेमळ जननी हळूहळू येई निद्रामाई
सर्व सुखांची प्रेमळ जननी हळूहळू येई निद्रामाई
होऊन आता तुझीच आई चुंबित राही वत्सलता ही
निजली अंगाई नीज गुणिले नीज लवलाही

Trivia about the song Punavechya Ghari by Lata Mangeshkar

Who composed the song “Punavechya Ghari” by Lata Mangeshkar?
The song “Punavechya Ghari” by Lata Mangeshkar was composed by Vasant Prabhu, P Savalaram.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score