Sandhiprakashat [Studio]

BALAKRISHNA BHAGWANT BORKAR, SALIL KULKARNI

आयुष्याची आता झाली उजवण
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणींचे बिंब
तुझें प्रतिबिंब लाळेगोळे
उमटल्या शब्दे नवीन पहाट
पावलात वाट माहेराची
अंतर बाहयात आनंद कल्लोळ
अंतर बाहयात आनंद कल्लोळ
श्वाशी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवे आशा जीव अनावर
पिंजऱ्याचें दार उघडावे
पिंजऱ्याचें दार उघडावे

संधिप्रकाशांत अजून जो सोनें
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

असावीस पास जसा स्वप्नभास
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर नात्याहूनी तीर्थ दुजे
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
भुलीतली भूल शेवटली
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
तो माझी लोचने मिटो यावी
तो माझी लोचने मिटो यावी
तो माझी लोचने मिटो यावी

Trivia about the song Sandhiprakashat [Studio] by Lata Mangeshkar

Who composed the song “Sandhiprakashat [Studio]” by Lata Mangeshkar?
The song “Sandhiprakashat [Studio]” by Lata Mangeshkar was composed by BALAKRISHNA BHAGWANT BORKAR, SALIL KULKARNI.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score