Savalis Ka Kale
साउलीस का कळे
साउलीस का कळे उन्हामधील यातना
जाणवेल मीलनी कोण विरह वेदना
साउलीस का कळे
असती माहिती कशी नदीस घोर वादळे
असती माहिती कशी नदीस घोर वादळे
आसवात जग बुडे
आसवात जग बुडे मृगजळास का कळे
जी व्यथा नभातली ती कथाच अंगणा
साउलीस का कळे
फूलपंखी का कधी गरुड झेप घेतसे
फूलपंखी का कधी गरुड झेप घेतसे
काजळी तमास का रंग कोण देतसे
हृदयशून्य करील कोण मंदिरात प्रार्थना
साउलीस का कळे
रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा
रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा
दिसती ना कधी कुणा
दिसती ना कधी कुणा अंतरातल्या खुणा
सांगते अबोली का कुणास मुग्ध भावना
साउलीस का कळे उन्हामधील यातना
जाणवेल मीलनी कोण विरह वेदना
साउलीस का कळे