Shrirama Ghanshyama

P . Savlaram

श्रीरामा, घनश्यामा बघशिल कधि तू रे?
तुझी लवांकुश बाळे रामा
तुझी लवांकुश बाळे श्रीरामा घनश्यामा

वनवासाच्या घरात माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतिचे दु: खही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी सीता
लावीला रे आनंदाला गालबोट लागले रे रामा
गालबोट लागले श्रीरामा घनश्यामा

रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ति
पूर्ण पाहिले तुला राघवा तरि ही दैवगती
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले रामा
वनवासी झाले श्रीरामा घनश्यामा

बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा पडु दे श्यामलकंठी
ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठीं
मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
माझे रामायण संपले श्रीरामा घनश्यामा

Trivia about the song Shrirama Ghanshyama by Lata Mangeshkar

Who composed the song “Shrirama Ghanshyama” by Lata Mangeshkar?
The song “Shrirama Ghanshyama” by Lata Mangeshkar was composed by P . Savlaram.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score