Sukh Yeta Majhya Dari

P SAVALARAM, VASANT PRABHU

सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल
सुखासवे तो उदया येईल दिन सोन्याचा संसारी
सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी

सुवासिनीच्या देहतरूवर हर्ष-फुलांचा फुलता मोहर
सुवासिनीच्या देहतरूवर हर्ष-फुलांचा फुलता मोहर
गंधवती मी होऊन जाइन
गंधवती मी होऊन जाइन सुखदेवाला सामोरी
सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी

नेत्रशिंपली भरता स्वाती आनंदाचे झरता मोती
नेत्रशिंपली भरता स्वाती आनंदाचे झरता मोती
पति प्रेमावर उधळित राहिन
पति प्रेमावर उधळित राहिन मनोमनीच्या देव्हारी
सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी

अमर सुखाची पडता दृष्टी उजळून जाता जीवनसृष्टी
अमर सुखाची पडता दृष्टी उजळून जाता जीवनसृष्टी
उणे न काही सुखरूप मीही
उणे न काही सुखरूप मीही सर्व सुखाच्या मंदिरी
सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी

Trivia about the song Sukh Yeta Majhya Dari by Lata Mangeshkar

Who composed the song “Sukh Yeta Majhya Dari” by Lata Mangeshkar?
The song “Sukh Yeta Majhya Dari” by Lata Mangeshkar was composed by P SAVALARAM, VASANT PRABHU.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score