Swapna Udyache Aaj Padte

Vasant Prabhu, P Savlaram

स्वप्न उद्याचे आज पडते
स्वप्न उद्याचे आज पडते
चित्र चिमणे गोजिरवाणे
नयनापुढती दुडदुडते
स्वप्न उद्याचे आज पडते

कट्यार चिमणी कटिला साजे
जिरेटोप तो सान विराजे
कट्यार चिमणी कटिला साजे
जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे
शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते
स्वप्न उद्याचे आज पडते

चितोडगडचा शूर इमानी
प्रताप राणा बाल होउनी
चितोडगडचा शूर इमानी
प्रताप राणा बाल होउनी
मिठी मारता दोन्ही करांनी
मिठी मारता दोन्ही करांनी
अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते
स्वप्न उद्याचे आज पडते

ऊठ म्हणता उठते क्रांती
ज्याच्या मागून फिरते शांती
ऊठ म्हणता उठते क्रांती
ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती
जवाहिराची राजस मूर्ती
लाडेलाडे आई म्हणता
भारतदर्शन मज घडते
स्वप्न उद्याचे आज पडते
स्वप्न उद्याचे आज पडते

Trivia about the song Swapna Udyache Aaj Padte by Lata Mangeshkar

Who composed the song “Swapna Udyache Aaj Padte” by Lata Mangeshkar?
The song “Swapna Udyache Aaj Padte” by Lata Mangeshkar was composed by Vasant Prabhu, P Savlaram.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score