Tujha Sahavas

Salil Chowdhury, Shanta Shelke

तुझा सहवास प्रिया
निळा अवकाश गती पवनास फुला विकास
उरी उल्हास प्रिया
नवीन दिशा नवीच उषा नवा मधुमास
तुझा सहवास प्रिया
निळा अवकाश गती पवनास फुला विकास
तुझा सहवास

बुजरी अजाण प्रीती
नवखी मनात भीती
बुजरी अजाण प्रीती
नवखी मनात भीती
अधरी अबोध गीती
नवखीच आस नवे नि:श्वास
तुझा सहवास प्रिया
निळा अवकाश गती पवनास फुला विकास
तुझा सहवास

तुझियासवेच नाथा
जग हे सुरम्य आता
तुझियासवेच नाथा
जग हे सुरम्य आता
सुमनी सुगंध आले
जग चांदण्यात न्हाले
सुमनी सुगंध आले
जग चांदण्यात न्हाले
तमही प्रकाश झाले
सुखवी जीवा नवा अभिलाष
तुझा सहवास प्रिया
निळा अवकाश गती पवनास फुला विकास
उरी उल्हास प्रिया
नवीन दिशा नवीच उषा नवा मधुमास
तुझा सहवास

Trivia about the song Tujha Sahavas by Lata Mangeshkar

Who composed the song “Tujha Sahavas” by Lata Mangeshkar?
The song “Tujha Sahavas” by Lata Mangeshkar was composed by Salil Chowdhury, Shanta Shelke.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score