Tumhi Re Don

Aarti Prabhu, Hridaynath Mangeshkar

तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
एक धाकुला मनाचा किती किती मऊ सांग

एक धाकुला मनाचा किती किती मऊ सांग
जाई जुई हुन सुद्धा
तर दुसरा मोठा मोठा जणू काय खडक थोरला
तर दुसरा मोठा मोठा जणू काय खडक थोरला
त्यांत सुद्धा मधाचा झरा गोड गो
त्यांत सुद्धा मधाचा झरा
माया दोघांची नव्हे अशी तशी सोनंच बावनकशी
तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
तुम्ही रे दोन

एक लहाना मंजूळपणे म्हणतो ताई
एक लहाना मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी कितीतरी माया त्याची
बापासारखा आईसारखा
बापासारखा आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहुनी सख्खी दोन
तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
तुम्ही रे दोन

हा उभा गाव अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
हा उभा गाव अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा पापी असणार तरी कसा
रानातला झरा पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी
तुम्ही रे दोन दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत

Trivia about the song Tumhi Re Don by Lata Mangeshkar

Who composed the song “Tumhi Re Don” by Lata Mangeshkar?
The song “Tumhi Re Don” by Lata Mangeshkar was composed by Aarti Prabhu, Hridaynath Mangeshkar.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score