Tumhavar Keli Mee Marji Bahaal [Remake]

Jagdish Khebudkar, Kadam Ram

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

पापण्यांची तोरणं
बांधून डोळ्यांवरती
पापण्यांची तोरणं
बांधून डोळ्यांवरती
ही नजर उधळीते काळजातली पीरती
ही नजर उधळीते काळजातली पीरती

जवळ यावं मला पुसावं
गुपित माझं खुशाल
गुपित माझं खुशाल

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

हुरहुर म्हणू की ओढ
म्हणू ही गोड
हुरहुर म्हणू की ओढ
म्हणू ही गोड
या बसा मंचकी सुटल
गुलाबी कोडं

विरह जाळता मला रात ही
पसरी मायाजाल
पसरी मायाजाल

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

लाडेलाडे अदबीनं
तुम्हां विनवते बाई
लाडेलाडे अदबीनं
तुम्हां विनवते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा
तुमच्या पायी
पिरतीचा उघडला पिंजरा
तुमच्या पायी

अशीच ऱ्हावी रात साजणा
कधी न व्हावी सकाळ
कधी न व्हावी सकाळ

तुम्हांवर केली मी
मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

Trivia about the song Tumhavar Keli Mee Marji Bahaal [Remake] by Usha Mangeshkar

Who composed the song “Tumhavar Keli Mee Marji Bahaal [Remake]” by Usha Mangeshkar?
The song “Tumhavar Keli Mee Marji Bahaal [Remake]” by Usha Mangeshkar was composed by Jagdish Khebudkar, Kadam Ram.

Most popular songs of Usha Mangeshkar

Other artists of Film score