Ye Devina Jeevala
अहो माझी अंबाबाई
जणू फुल जाई जुई
हिच्या डोंगरी मायेचा गारवा
हिच्या डोंगरी मायेचा गारवा
इथं गोड गोड फळ
थंड पाण्याचं तळं
हिच्या नावात अमृत गोडवा
हिच्या नावात अमृत गोडवा
इथं आंब्याची आमराई ग
इथं सावली ठाई ठाई ग
अहो थाट आईचा पाहून आसला
भक्त धावती तुळजापूरी
दुःख सांगती लोळण घेती
अंबिकेच्या चरणावरी ग ग ग ग
पूजेसाठी पाहा जमती हजारो लोकं
लोकं
व्हय व्हय अगं लोकं
तुळजापुरी असा भक्तीचा मेळा
पाहून जीव हा होतोय खुळा
देवीनं जीवाला लावलाय लळा
बाई मी झाले सुखी
या देवीनं जीवाला लावलाय लळा
सारे झाले सुखी
अशी ही सुंदर आई ग
तुळजापूराच्या ठाई ग
अशी ही सुंदर आई ग
तुळजापूराच्या ठाई ग
कपाळी गोल गोल शोभे टिळा
चमचम करतंय सोनं गळा
दरवर्षाला येते मी राऊळा
बाई मी झाले सुखी
या देवीनं जीवाला लावलाय लळा
बाई मी झाले सुखी
या देवीनं जीवाला लावलाय लळा
न सारे झाले सुखी