Dhyani Mani Vitthal Ramla
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
उरी अंतरंगी गजर नामाचा
गाभारा मनी उजळला
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
झंकारले स्वर अनु रेणुतुनी
जणू सप्त सूरांची पर्वणी
प्रतिबिंब तयाचे माझ्यावरी
साक्षात्कार घडतो क्षणोक्षणी
हृदयाचा ठेका सम धरूनी
हृदयाचा ठेका सम धरूनी
जयघोष झाला स्पंदनातला
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अनुभवले रूप ते सावळे
अनुभूती काय ती आज कळे
दिसे ठायीठायी माझी विठाई
मज भास होई चोहीकडे
तो निराकार परि सर्वव्यापी
तो निराकार परि सर्वव्यापी
कुणी मुर्तरूप आकारला
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
उरी अंतरंगी गजर नामाचा
गाभारा मनी उजळला
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी मनी विठ्ठल रमला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल