Dari Pausa Padate

दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो
आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग सुगंध मातीचा
दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो
आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग सुगंध मातीचा

श्रावणात सारे जीव झाले बाई ओले
ऊन हळदीचे पानापानांतुन खेळे
श्रावणात सारे जीव झाले बाई ओले
ऊन हळदीचे पानापानांतुन खेळे
हो उभी पिके हिंडोलती बाळे झाडांची बोलती
आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग सुगंध मातीचा

वसुंधरा आज नवरसात बुडाली
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली
वसुंधरा आज नवरसात बुडाली
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली
आकाशी उडाली
श्रियाळ राजाचा सण चांगुणा मातेचा
नागपंचमीचा देव तो ग शोभला
हो कुणी गौरी ग पूजिती गोफ रेशमी विणती
आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग सुगंध मातीचा
दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो
आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग सुगंध मातीचा
आला आला ग सुगंध मातीचा
आला आला ग सुगंध मातीचा

Trivia about the song Dari Pausa Padate by सुमन कल्याणपुर

When was the song “Dari Pausa Padate” released by सुमन कल्याणपुर?
The song Dari Pausa Padate was released in 2012, on the album “Bhaav Suman”.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music