Maj Nakot Ashru

Snehal Bhatkar, G D Madgulkar

मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा मज घाम हवा

मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा
मंत्र नवा मंत्र नवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा
मंत्र नवा मंत्र नवा
मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा

होते तैसी अजून उते मी
सधन अन्‍नदा सुवर्णभूमी
खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा
मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा

अपार लक्ष्मी माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी
एक मूठभर अन्‍नासाठी
जगतोस तरी का भ्याड जीवा
मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा

काय लाविसी हात कपाळी
फेकून दे ती दुबळी झोळी
जाळ आळसाची तव होळी
तू जिंक बळाने पराभवा
मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा

मोल श्रमाचे तुला कळू दे
हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा
मज नकोत अश्रू घाम हवा
घाम हवा घाम हवा

Trivia about the song Maj Nakot Ashru by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Maj Nakot Ashru” by सुमन कल्याणपुर?
The song “Maj Nakot Ashru” by सुमन कल्याणपुर was composed by Snehal Bhatkar, G D Madgulkar.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music