Mazya Viran Hridayin
माझ्या विराण हृदयी
पाहू नकात कोणी
आहे अजून ओली
इष्कातली निशाणी
उधळूनी डाव गेला
धुंदीत खेळलेला
सहवास यौवनाचा
लाभून यौवनाला
आता मुक्या स्मृतीने
जळते उभी जवानी
आहे अजून ओली
इष्कातली निशाणी
बेहोष होऊनिया
हितगूज जेथ केले
निमिषात त्या ठिकाणी
सारे मिटून गेले
आता अखंड वाहे
डोळ्यांमधून पाणी
आहे अजून ओली
इष्कातली निशाणी
मस्तीत प्रियतमेने
ज्या फेकले फुलाला
दळभार त्या फुलाचा
सारा सुकून गेला
आणि तरी तयाला
येतोच गंध अजुनी
आहे अजून ओली
इष्कातली निशाणी
आहे अजून ओली
इष्कातली निशाणी