Kshan Ha Virala
क्षण हा विरला
डोळ्यामध्ये दाटला
क्षण का हरवला
वाटेवरी भिजला
बाबा तुझा आई तुझी
शोधते रे तुला
क्षण हा विरला
डोळ्यामध्ये दाटला
क्षण का हरवला
वाटेवरी भिजला
बाबा तुझा आई तुझी
शोधते रे तुला
हरवले क्षण कसे
आज वाटे हवे
साथ होती तुझी
बंध होते नवे
दुर जाता कधी
सावरावे तुला
कौतुकाने पुन्हा
मी पहावे तुला
परतुनी जावे कसे
सांगना तू जरा
धीर सुटला आज रे
हाक देना जरा
बाबा तुझा आई तुझी
शोधते रे तुला
लुकलुक डोळ्यांची
एक परी
ईवल्या पायांनी
आली घरी
आंगण खेळांनी रंगले
कट्टी बट्टी तेव्हाची वाटे खरी
नको आता ही लुकाछुपी
ऐकना तू जरा
धीर सुटला आज रे
हाक दे ना जरा
बाबा तुझा आई तुझी
शोधते रे तुला