Ha Mast Sama

Yugandhar Deshmukh, Traditional

हा मस्त समा, बेधुंद हवा
क्षणा क्षणात भरला हर्ष नवा
हा मस्त समा, बेधुंद हवा
क्षणा क्षणात भरला हर्ष नवा

दिन हो या रात, चले साथ-साथ
या मैत्रीच्या नात्याने रंगले जीवन, रंगले जीवन
या मैत्रीच्या नात्याने रंगले जीवन

रोज नित्य नवी इक वाट धरू
विसरू तणावण ताल धरू
रोज नित्य नवी इक वाट धरू
विसरू तणावण ताल धरू

छेडू तरंग, आम्ही सप्तरंग
होऊनी दंग बिनधास्त जगू हे जीवन, हे जीवन
छेडू तरंग, आम्ही सप्तरंग
होऊनी दंग बिनधास्त जगू हे जीवन, हे जीवन

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
असते तुमच्या पाठी सखे-सोबती
संग हसती, संग गाती
कधी चिडती, खुप चिडवती सखे-सोबती

चिंता ना उद्याची, ना आम्हा पर्वा कुणाची
मनगटाच्या बळावर देतो खात्री यशाची
चिंता ना उद्याची, ना आम्हा पर्वा कुणाची
मनगटाच्या बळावर देतो खात्री यशाची

स्वप्ने सारे साकार करू
चला उठा यशाची कास धरू
स्वप्ने सारे साकार करू
चला उठा यशाची कास धरू

जितेंगे जंग, यारों के संग
मैत्रीने दिले बळ जगायचे हे जीवन, हे जीवन
जितेंगे जंग, यारों के संग
मैत्रीने दिले बळ जगायचे हे जीवन, हे जीवन

तोडून बंधने सारी
होऊन पक्षी स्वछंद उडु आकाशी (आकाशी)
घेऊ उंच भरारी
या मुठीत माझ्या बंद ही दुनिया सारी

ओ ओ ओ ओ ला ला ला ला ला

धगधगतो तपतं अंगार मनी
राखेतून जग निर्माण करू
धगधगतो तपतं अंगार मनी
राखेतून जग निर्माण करू

हा जोश नवा, जल्लोष पूर्ण
विश्वास मनी निर्माण करू नवजीवन, नवजीवन
हा जोश नवा, जल्लोष पूर्ण
विश्वास मनी निर्माण करू नवजीवन, नवजीवन, नवजीवन

Most popular songs of प्रियांका बर्वे

Other artists of Film score