Saawalya
Rahul Deshpande
हो, अश्या वेळी कोठूनी आल्या सावल्या, सावल्या
कश्या मनातून पुन्हा उसवल्या सावल्या, सावल्या
पापण्यांच्या काठावरती धावल्या सावल्या
अश्या वेळी कोठूनी आल्या सावल्या, सावल्या
हो हो हो ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
हो, खोल मनातून रंग उमटले
बंद मुठीतून क्षण हे निसटले
रंग नव्हे श्वास कुणाला कळले(आ आ आ)
गहिरे सारे घाव मनीचे
चेहऱ्यावरती भाव दंवाचे
अश्रु नव्हे भास मनीचे सरले
आ आ आ
हो, आठवत चिंब मी पावसाची सर ती
स्वप्न वेडा मेघ तो दूर-दूर नेऊनी
चालला-चालला आठवांचा काफीला
लांबल्या, दाडल्या इथे-तिथे धावल्या सावल्या, सावल्या
आ आ आ आ आ आ
अश्या वेळी कोठूनी आल्या सावल्या, सावल्या
कश्या मनातून पुन्हा उसवल्या सावल्या, सावल्या