Aarti Sai Baba
आरती साईबाबा सौख्यदातारा जीवा
चरणरजतळीं निज
दासां विसावां भक्तां विसावा
आरती साईबाबा
जाळुनियां अनंग स्वस्वरुपी राहे दंग
मुमुक्षुजना दावी निजडोळां श्रीरंग
डोळां श्रीरंग
आरती साईबाबा
जया मनीं जैसा भाव
तया तैसा अनुभव
दाविसी दयाघना
ऐसी ही तुझी माव
तुझी माव
आरती साईबाबा
तुमचें नाम ध्यातां हरे संसृतिव्यथा
अगाध तव करणी
मार्ग दाविसी अनाथा
दाविसी अनाथा
आरती साईबाबा
कलियुगीं अवतार
सगुणब्रह्म साचार
अवतीर्ण झालासे
स्वामी दत्त दिगंबर
दत्त दिगंबर
आरती साईबाबा
आठा दिवसां गुरुवारी
भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया भवभय निवारी
भवभय निवारी
आरती साईबाबा
माझा निजद्रव्य ठेवा
तव चरणसेवा
मागणें हेंचि आता
तुम्हा देवाधिदेवा
देवाधिदेवा
आरती साईबाबा
इच्छित दीन चातक
निर्मळ तोय निजसुख
पाजावें माधवा या सांभाळ आपुली भाक
आपुली भाक
आरती साईबाबा
आरती साईबाबा
आरती साईबाबा