Aai Sarakhe Daivat

Davjekar Datta, G D Madgulkar

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
हो हो शिकणे अ आ ई
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक हो हो
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी
मस्तक आईच्या पायी
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
हो हो शिकणे अ आ ई
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला आ आ आ
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी ओ ओ ओ
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई
घडवी माय जिजाबाई
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
हो हो शिकणे अ आ ई
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा ओ ओ ओ
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई
तियेचा होई उतराई
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
हो हो शिकणे अ आ ई

Trivia about the song Aai Sarakhe Daivat by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Aai Sarakhe Daivat” by सुमन कल्याणपुर?
The song “Aai Sarakhe Daivat” by सुमन कल्याणपुर was composed by Davjekar Datta, G D Madgulkar.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music