Chal Uth Re Mukunda [Album]

Dasharath Pujari, Suresh Bhat

चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली
झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन चोरपावलांनी आला पहाटवारा
गालावरी उषेच्या आली हळूच लाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

घे आवरून आता
घे आवरून आता स्वप्नातला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

तुज दूर हाक मारी कालिंदीचा किनारा
कुंजातल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

Trivia about the song Chal Uth Re Mukunda [Album] by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Chal Uth Re Mukunda [Album]” by सुमन कल्याणपुर?
The song “Chal Uth Re Mukunda [Album]” by सुमन कल्याणपुर was composed by Dasharath Pujari, Suresh Bhat.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music