Gupit Ek Sangate Dupari

ASHOK PATKI, ASHOKJI PARANJAPE

सहज तुला हं हं गुपित सांगते दुपारी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी
बैसते ओटीवरीनजर वळे अंगणी
अंगणांत बहरते रानजाई देखणी
जाई खाली उभा असे हासरा शिकारी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
हो सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
सोडते ग धारेसाठीओढ घेई वासरू
गोठ्यामध्ये दिसे सखेसावळा मुरारी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

पहाटेला ओठावरी गीत एक जागले
पहाटेला ओठावरी गीत एक जागले
अंतरात कोणसेहळुच बाई बोलले
ओढळले मन नेई माझिया सासरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

Trivia about the song Gupit Ek Sangate Dupari by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Gupit Ek Sangate Dupari” by सुमन कल्याणपुर?
The song “Gupit Ek Sangate Dupari” by सुमन कल्याणपुर was composed by ASHOK PATKI, ASHOKJI PARANJAPE.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music