Jethe Jato Tethe

Sant Tukaram

जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तूं माझा संगाती
चालविसी हातीं धरुनियां
चालों वाटे आह्यी तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा
जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती

बोलों जातां बरळ करिसी ते नीट
बोलों जातां बरळ करिसी ते नीट
नेली लाज धीट केलों देवा
नेली लाज धीट केलों देवा केलों देवा
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तूं माझा संगाती

अवघे जन मज झाले लोकपाळ
अवघे जन मज झाले लोकपाळ
सोईरे सकळ प्राणसखे प्राणसखे
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तूं माझा संगाती

तुका म्हणे आता खेळतो कौतुके
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
झाले तुझे सुख आंतर्बाह्या
झाले तुझे सुख आंतर्बाह्या आंतर्बाह्या
जेथें जातों तेथें तूं माझा संगाती
चालविसी हातीं धरुनियां
चालों वाटे आह्यी तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा
जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती

Trivia about the song Jethe Jato Tethe by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Jethe Jato Tethe” by सुमन कल्याणपुर?
The song “Jethe Jato Tethe” by सुमन कल्याणपुर was composed by Sant Tukaram.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music