Patiwarati Girwa Akshar

Jayant Marathe, Sudhir Phadke

पाटीवरती गिरवा अक्षर अक्षर जोडून शब्द करा
अपुले वैभव अपुल्या हाती हाच आजचा मंत्र खरा
एक अक्षरा अर्थ नसे रे अनेक मिळुनी अर्थ कळे
एक एकटा मागे पडतो एकजुटीने सर्व मिळे
शिकेल त्याच्या हाती उद्याचे नवीन जीवन घडे
चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे

शिकल्यावाचून व्यर्थच सारे शिक्षणआहे प्रगती रे
अज्ञानाचा मार्ग निकामी विज्ञानाची चलती रे
नवजीवन हे घेऊन आता सुराज्य येथे आणू या
भेद भावना विसरून आपण एकदिलाने राहूया
क्रांती सरली शांतीयुगाची नौबत आता झडे
चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे
चला जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे

अपुले घर हे अपुले मंदिर स्वच्छ करा रे गाभारा
पवित्र घर अन् पवित्र मन रे हा देवाचा देव्हारा
आरोग्याचा पंथ आजचा व्यायामाची कास धरा
बलशाली रे होऊन आपण बलशाली देशास करा
विकास अपुला साधायाचा मार्ग आपल्याकडे
चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे
चला जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे

पुण्यभूमी देशात आपल्या नर-रत्नांच्या खाणी रे
शूर शिवाजी इथे जन्मला अन् झाशीची राणी रे
परकियांशी लढता लढता कितीक कामी आले रे
स्वातंत्र्याची ज्योत राखण्या किती हुतात्मे झाले रे
भवितव्याला साक्ष सांगण्या पुण्य आपुले खडे
चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे
चला जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे

Trivia about the song Patiwarati Girwa Akshar by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Patiwarati Girwa Akshar” by सुमन कल्याणपुर?
The song “Patiwarati Girwa Akshar” by सुमन कल्याणपुर was composed by Jayant Marathe, Sudhir Phadke.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music