Tujhya Kantisam Raktapataka

G. D. Madgulkar

तुझ्या कांतिसम रक्तपताका
पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला प्रभात झाली
ऊठ महागणपती
ऊठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे
तुझे मूषकध्वजा
सुभद सुमंगल सर्वाआधी
तुझी पाद्यपूजा
छेडुन वीणा
छेडुन वीणा जागविते तुज
सरस्वती भगवती
अरुण उगवला प्रभातझाली
ऊठ महागणपती
ऊठ महागणपती

आवडती तुज म्हणुनि आणिली
आवडती तुज आवडती तुज
म्हणुनि आणिली
रक्तवर्ण कमळे
पांचमण्याच्या किरणांसम ही
हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चौदा विद्या
घेउनिया आरती
अरुण उगवला प्रभात झाली
ऊठ महागणपती
ऊठ महागणपती

शुर्पकर्णका ऊठ गजमुखा
उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तुच नियंता
विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा
हर ब्रम्हा श्रीपती
अरुण उगवला प्रभात झाली
ऊठ महागणपती
ऊठ महागणपती
तुझ्या कांतिसम रक्तपताका
पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला प्रभात झाली
ऊठ महागणपती
ऊठ महागणपती

Trivia about the song Tujhya Kantisam Raktapataka by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Tujhya Kantisam Raktapataka” by सुमन कल्याणपुर?
The song “Tujhya Kantisam Raktapataka” by सुमन कल्याणपुर was composed by G. D. Madgulkar.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music