Ughadle Ek Chandani Daar

Vasant Pawar, G D Madgulkar

उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार
उजेड दिसतो आत केशरी
उजेड दिसतो आत केशरी सोन्याचा संसार
उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार

मांडवात मी सहज चालले मांडवात मी सहज चालले
धन्यासंगती सात पाऊले धन्यासंगती सात पाऊले
येता येता कुठे पोचले
घर कसले हे धरणीवरती स्वर्गाचा अवतार
उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार

वस्तू वस्तू इथे देखणी वस्तू वस्तू इथे देखणी
दौलत भरते सदैव पाणी दौलत भरते सदैव पाणी
या घरची मी झाले राणी
कुण्या जन्मीच्या पुण्याईने आला हा अधिकार
उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार

नवस करुनिया कुठल्या देवा नवस करुनिया कुठल्या देवा
असा सुखाचा लाभे ठेवा असा सुखाचा लाभे ठेवा
वडिल माऊली यांना ठावा सुखातही या येतो आठव त्यांचा वारंवार
उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार

Trivia about the song Ughadle Ek Chandani Daar by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Ughadle Ek Chandani Daar” by सुमन कल्याणपुर?
The song “Ughadle Ek Chandani Daar” by सुमन कल्याणपुर was composed by Vasant Pawar, G D Madgulkar.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music