Ya Gade Hasuya
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
खेळू या फुगडी धरुनिया फेर
खेळू या फुगडी धरुनिया फेर
रचू या आरास चौरंगी चौफेर
रचू या आरास चौरंगी चौफेर
देऊ या घेऊ या प्रेमाचा आहेर
देऊ या घेऊ या प्रेमाचा आहेर मिळून थोर-लहान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
आपुली धरती आपुले आकाश
आपुली धरती आपुले आकाश
आपुला सागर आपुला प्रकाश
आपुला सागर आपुला प्रकाश
सुनील नभात गुंजते रंगात
सुनील नभात गुंजते रंगात खगांचि स्वच्छंद तान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
वादळाचे वारे घोंघावे जगात
वादळाचे वारे घोंघावे जगात
शांतिचे चांदणे माझ्या माहेरात
शांतिचे चांदणे माझ्या माहेरात
मावेना आनंद दृष्टीत देहात
मावेना आनंद दृष्टीत देहात वाटते हरपे भान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान
या गडे हासू या या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान